वैजापूर : रात्रीची गस्त घालत असताना वाळूची अवैध वाहतूक करणारा विनाक्रमांकाचा एक टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला. या टेम्पोची किंमत 12 लाख रुपये असून, आठ हजारांची दोन ब्रास वाळू असा एकूण बारा लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
वैजापूर पोलिस काल शनिवारी रात्री गस्त घालत होते. यादरम्यान वैजापूर येथील लाडगाव चौफुलीवर विनानंबर पासिंग झालेला एक टाटा टेम्पो 912 पोलिसांना आढळून आला. वाळूची अवैध वाहतूक करणारा हा विनाक्रमांकाचा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला असून, याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सदर कारवाई वैजापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतापसिंग बहुरे, पोलिस नाईक गुणवंत थोरात व चालक पोलिस शिपाई अख्तर शेख यांनी केली.